मराठीत उखाणा घेत 'धकधक गर्ल'ने दिला धक्का!

मराठीत उखाणा घेत 'धकधक गर्ल'ने दिला धक्का!

  • Share this:

madhuri02 मार्च :   तेजाब चित्रपटातल्या आपल्या भूमिकेमुळे अवघ्या तरुणाईला एकेकाळी वेड लावणार्‍या 'मोहिनी'ने काल नाशिकरांवर आपल्या अदांची जादू पसरवली, लाखो दिलो की धडकन, म्हणजेच आपली धकधक गर्ल,  माधुरी दिक्षीत– नेने शनिवारी आपल्या नाशिकमध्ये होती. लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी माधुरी नाशिकमध्ये आलेली होती. माधुरीच्या एका झलकेसाठी आतुर उपस्थित सखींची मने आपल्या अदाकरीने मोहवून टाकली.

गुलाब गॅंगच्या प्रोमोशन करणाऱ्या माधुरीसोबत काल निर्माता अनुभव सिन्हाही उपस्थित होता. या वेळी झालेल्या मुलाखतीत माधुरीने दिलखुलास गप्पा मारल्या. लग्न झालेल्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये यशस्वी होत नाहीत हा समजही माधुरीने खोटा ठरवलेला आहे.

मुलाखती दरम्यान, 'गुलाब गँगच्या निमित्ताने तुमचा आशिर्वाद घेणे, लाजत लाजत नाव घेते श्रीराम नेने' असा उखाणा घेऊन उपस्थित स्त्रियांची मनेही जिंकून घेतली.

First published: March 2, 2014, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading