भारत आणि पाकिस्तानदरम्यान रंगणार मुकाबला

  • Share this:

Image img_220632_indiavspakistanmatch_240x180.jpg02 मार्च : भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत काहीच क्षणात टीम इंडियाची लढत होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळल्या जाणार्‍या या सामन्यात पाकिस्ताचा कर्णधार मिसबाहने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान आहे.

ही लढत दोन्ही संघांचे भवितव्य ठरवणारी असेल.  दोन्‍ही संघाना हा सामना 'करा किंवा मरा!' ठरणार आहे. कारण ही लढत जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीमध्‍ये प्रवेश मिळेल, तर दुसरीकडे जो संघ ही लढत गमावेल त्याचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकते.

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची लढत जिंकली असली तरी त्यांना श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले होते आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दुस-या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे जो संघ या सामन्यात विजयी होईल, त्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2014 01:25 AM IST

ताज्या बातम्या