राष्ट्रवादीत मंत्र्यांना 'चलो दिल्ली', अजितदादांसाठी मैदान मोकळे?

राष्ट्रवादीत मंत्र्यांना 'चलो दिल्ली', अजितदादांसाठी मैदान मोकळे?

  • Share this:

4574574 sharad pawar and pawar01 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पण या यादीत ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आल्याचं दिसून येत आहे. यामागे अजित पवार यांच्यासाठी महाराष्ट्रातील मैदान मोकळे करण्याचा डाव आखण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे.

लोकसभेवर जायला किंवा मंत्रिपद सोडायला राष्ट्रवादीचा एकही मंत्री तयार नाही. पण तरीही छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता जयदत्त क्षीरसागर, जयंत पाटील किंवा सुनील तटकरे या ज्येष्ठ मंत्र्यांना देखील राष्ट्रवादीकडून लोकसभेवर पाठवलं जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेवर पाठवण्यामागे अजित पवारांचं नेत्तृत्व राज्यात भक्कम करण्याचा तर शरद पवारांचा डाव नाही ना अशी शंका उपस्थित केलीय जात आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मतदारसंघातून लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलाय. पण राष्ट्रवादीच्या या निर्णयाविरोधात आज भुजबळांच्या समर्थकांनी येवल्यामध्ये भुजबळ साहेबांना दिल्लीला पाठवू नका असं म्हणत कडकडीत बंद पाळला. कार्यकर्त्यांनी येवल्यात रास्ता रोको आंदोलनही केलं. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत, या चर्चेला एकप्रकारे पुष्टीच मिळालीय. पहिल्या यादीत छगन भुजबळ, मोहिते पाटील यांनी उमेदवारी देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरवून दिल्लीचे तिकीट कापले आहे. आता दुसरी यादी लवकरच जाहीर होणार त्यामुळे कुणाचे नाव जाहीर होणार आहे यावरच पुढंच गणित अंवलबून आहे.

 हे जाणार लोकसभेत?

जयदत्त क्षीरसागर

  • - विधानसभा- बीड
  • - लोकसभा- बीड ?

जयंत पाटील

  • - विधानसभा- वाळवा
  • - लोकसभा- हातकंणगले ?

सुनिल तटकरे

  • - विधानसभा- रोहा
  • - लोकसभा- रायगड ?

 

First published: March 1, 2014, 10:56 PM IST

ताज्या बातम्या