01 मार्च : आम आदमी पार्टी विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यातील निकार्याच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. आज शनिवारी 'आप'ने नितीन गडकरी यांच्या घरी भ्रष्टाचारासंदर्भातील पुराव्याची फाईल पाठवली आहे. गडकरींच्या घरी त्यांच्या पीएने ही फाईल स्विकारली आहे.
शुक्रवारी नितीन गडकरी यांनी आपल्याविरोधात कुणी एक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडून देवू असं सांगितलं होतं. यावर आम आदमी पार्टीच्या नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी आज पुरावे देण्याचं जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पुराव्याची फाईलच गडकरींच्या घरी पाठवून दिली. आज चार वाजेपर्यत गडकरींनी यावर उत्तर पाठवावं, असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय.
विशेष म्हणजे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत नितीन गडकरी यांच्या भ्रष्ट नेते म्हणून उल्लेख केला होता. आपच्या यादीमुळे नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आपल्या नेत्याला कोर्टात खेचल्यामुळे साहजिकच 'आप'चे कार्यकर्ते संतप्त झाले. 'आप'च्या सदस्या अंजली दमानिया यांनी गडकरींच्या विरोधात अधिक आक्रमक होत पुरावे पे पुरावे दिले आहे. आता गडकरी काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.