शिक्षकांच्या बहिष्काराचा 'पेपर'सुटला, निकाल वेळेवर लागणार

शिक्षकांच्या बहिष्काराचा 'पेपर'सुटला, निकाल वेळेवर लागणार

  • Share this:

234612th exam28 फेब्रुवारी : बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांना अखेर दिलासा मिळालाय. 10-12 वीच्या परीक्षांच्या पेपर तपासणीवरचा बहिष्कार शिक्षकांनी मागे घेतलाय. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली.

मुख्याध्यापक महासंघानं दोन दिवसांपूर्वी बहिष्कार मागे घेतला होता. त्यामुळे बहिष्कारात फूट पडली होती. पण महाविद्यालयीन शिक्षक संघांने मात्र हा बहिष्कार मागे न घेतल्यानं उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून होते. 3 मार्चपासून 10 वीची परीक्षा सुरू होतेय. विविध मागण्यासाठी ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले होते. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या पण शिक्षकांनी पेपर तपासणार नाही अशी भूमिका घेतली.

एवढेच नाहीतर उत्तरपत्रिकांचे गठ्ठेच स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासोबत महाविद्यालयीन शिक्षक संघ आणि माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अखेर तोडगा निघाला. शिक्षकांनी बहिष्कार मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि पेपर वेळेत तपासून निकाल वेळेवर लावला जाईल अशी ग्वाही संघटनेनं दिली.

First published: February 28, 2014, 10:44 PM IST

ताज्या बातम्या