श्रीलंकेचा भारतावर 2 विकेट राखून विजय

श्रीलंकेचा भारतावर 2 विकेट राखून विजय

  • Share this:

sangha kara28 फेब्रुवारी : एशिया कप स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलंय. श्रीलंकेनं भारतावर 2 विकेट राखून मात केली. शिखर धवनच्या 94 रन्सच्या जोरावर भारतानं पहिली बॅटिंग करत लंकसमोर 265 रन्सचं आव्हान विजयासाठी ठेवलं होतं. हे आव्हान लंकेनं 8 विकेटच्या मोबदल्यात 50व्या ओव्हरमध्ये पार केलं. संगकारानं सेंच्युरी ठोकत लंकेला विजय मिळवून दिला.

टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा लंकेनं निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. सेनानायकेनं रोहित शर्माला फक्त 13 रन्समध्ये पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहलीनं शिखर धवनच्या साथीनं टीम इंडियाची इनिंग सावरली. या दोघांनी 97 रन्सची महत्वाची पार्टनरशिप केली. पण विराट कोहलीची हाफ सेंच्युरी अगदी थोडक्यात हुकली. तो 48 रन्सवर आऊट झाला.

पण त्यानंतर आलेल्या अजिंक्य राहणेनं धवनला साथ दिली. पण मोठा स्कोर करण्याच्या नादात रहाणेही 22 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिखर धवनची सेंच्युरीही हुकली. धवननं 94 रन्स केले. पण त्यानंतर एकही बॅट्समन मोठा स्कोर करू शकला नाही. लंकेतर्फे अजंथा मेंडिसनं 4 तर सेनानायकेनं 3 विकेट घेतल्या. 265 रन्सचा पाठलाग करणार्‍या लंकेनं 50 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. संघकारा लंकेचा विजयाचा शिल्पकार ठरला. संघकाराने 84 बॉलमध्ये 103 धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2014 10:27 PM IST

ताज्या बातम्या