सेनेचे यादी जाहीर -सरांना नारळ, शेवाळेंना उमेदवारी

सेनेचे यादी जाहीर -सरांना नारळ, शेवाळेंना उमेदवारी

 • Share this:

new28 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नंतर आता शिवसेनेनंही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भ्रष्टाचाराचा निषेध करत शिवसेनेनं आघाडी सरकारचा पुतळा जाळला आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली.

 

पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना अपेक्षेप्रमाणे नारळ देण्यात आलंय. त्यांच्या जागी मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीय. तसंच कल्याणमध्ये आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे परांजपेंच्या विरोधात शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. ठाण्यात राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

 

कोकणात राणेंच्या बालेकिल्ल्यात सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांनी उमेदवारी देण्यात आलीय. यवतमाळमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंनी आपली जागा कायम राखली असून चौथ्यांदा ते रिंगणात उतरणार आहे. दर दुसरीकडे महायुतीचा शब्द पाळत हातकणंगलेची जागा महायुतीनं राजू शेट्टींसाठी तर सातार्‍याची जागा आरपीआयसाठी सोडलीय. माढ्यातल्या उमेदवारीची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

अशी सेनेची यादी

 

 • बुलडाणा - प्रतापराव जाधव
 • अमरावती - आनंदराव अडसूळ
 • यवतमाळ - भावना गवळी
 • परभणी -संजय जाधव
 • कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे
 • मुंबई दक्षिण - अरविंद सावंत
 • मुंबई उत्तर-पश्चिम - गजानन किर्तीकर
 • मुबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे
 • रायगड - अनंत गीते
 • रत्नागिरी - सिंधुदुर्ग - विनायक राऊत
 • ठाणे - राजन विचारे
 • हिंगोली - सुभाष वानखेडे
 • औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
 • रामटेक - कृपाल तुमाणे
 • शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील
 • सातारा रामदास आठवलेंसाठ
 • हातकणंगले राजू शेट्टीसाठी

 

First published: February 28, 2014, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading