बांगलादेशचा धुव्वा, भारताची विजयी सलामी

बांगलादेशचा धुव्वा, भारताची विजयी सलामी

  • Share this:

asia cup 2014 india vs bangla26 फेब्रुवारी : एशिया कप स्पर्धेत भारतानं यजमान बांगलादेशला पराभूत करून विजयी सलामी दिलीय. भारताने बांगलादेशचा 6 विकेट राखून पराभव केलाय. पहिली बॅटिंग करणार्‍या बांगलादेशनं 7 विकेट गमावत 279 रन्स केले. विजयाचं हे आव्हान भारतानं 4 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. कॅप्टन विराट कोहलीनं शानदार सेंच्युरी केली. कोहली 136 रन्सवर आऊट झाला. तर मुंबईकर अजिंक्य रहाणेनं 73 रन्स करत कोहलीला चांगली साथ दिली.

टीम इंडियानं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामीनं टीम इंडियाला चांगली सुरुवातही करुन दिली. शामीने शमशूर रहमानला 7 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पण ओपनर अनामिल हक आणि मोमीनुल हकनं बांगलादेशची इनिंग सावरली. पण अश्विननं मोमीनुल हकला 23 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. पण अनामुल हकनं शानदार फटकेबाजी करत शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. त्यानं 3 सिक्स आणि 5 फोर मारत 77 रन्स केले.

त्याला मुशफिकार रहिमं याने चांगली साथ दिली. रहिमनं धुवाँधार कामगिरी करत शानदार सेंच्यरी ठोकली. रहिमनं 7फोर आणि 2 सिक्स ठोकत 117 रन्स केले. पण त्यानंतर बांगलादेशच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. अपेक्षेप्रमाणे विकेटनं बॅटिंगला साथ दिली. त्यामुळे बांगलादेशनं मोठा स्कोर उभारला. भारतातर्फे मोहम्मद शामीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर भारतानं आपल्या इनिंगची सावध सुरूवात केली. विजयाचं हे आव्हान भारतानं 4 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. कॅप्टन विराट कोहलीनं शानदार सेंच्युरी केली. कोहली 136 रन्सवर आऊट झाला. तर मुंबईकर अजिंक्य रहाणेनं 73 रन्स करत विजयात भर घातली.-

First published: February 26, 2014, 10:15 PM IST

ताज्या बातम्या