रंगपंचमीला रंग उडवणा-यांवर पोलिसांची करडी नजर

11 मार्च धुळवड साजरी करण्यासाठी आता सगळेच सज्ज झालेत. पण ती साजरी करताना आपण नाहक कोणावरही रंग टाकला. तर आपल्यावर कारवाई होणार आहे. कारण पोलिस आपल्यावर करडी नजर ठेवून आहेत. होळी, ईद ए मिलाद, रंगपंचमी आणि शिवजयंती हे चारही सण एकत्र आल्यानं पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात.. सगळीकडे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीये. संपूर्ण नवी मुंबई शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. शहरात मोठ्या संख्येनं पोलिस तैनात करण्यात आलेत, ' असं नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस कमिशनर अशोक पंधारे यांनी दिली.रंगपंचमीला रेल्वेतून फुगे फेकण्यार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलीये. आरपीएफनं यासाठी लोकल ट्रेनच्या बाजुच्या झोपड्यांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवलाय. सायन, मुंब्रा, डोंबिवली, वडाळा, किंग सर्कल, वांद्रे, माहीम, चेंबूर, मानखुर्द या भागांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जर यातूनही कोणी फुगा मारण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर रेल्वे ऍक्टनुसार कारवाई होऊ शकते तसंच 5 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2009 07:29 AM IST

ताज्या बातम्या