रिलायन्स-टाटाकडून जनतेची फसवणूक, दमानियांची आगपाखड

रिलायन्स-टाटाकडून जनतेची फसवणूक, दमानियांची आगपाखड

  • Share this:

anjal damaniya 426 फेब्रुवारी : रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन्ही कंपन्या जनतेची फसवणूक करत आहे आणि एमईआरसी दोन्ही कंपन्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या सदस्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

तसंच विदर्भात वीजेची गरज असतानाही विदर्भातलीच वीज मुंबईला दिली जाते आणि यामुळे विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतायत असा आरोपही दमानिया यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन आरोपाच्या फैरी झाडल्यात.

काही दिवसांअगोदरच अंजली दमानिया यांनी ऊर्जा खात्यात 20 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीने अंजली दमानियांचे आरोप फेटाळून लावलेच होते पण महानिर्मितीने 'आप'चे आरोप धांदट खोटे असल्याचं म्हटलं होतं. भांडवली गुंतवणुकीची गरज समजून न घेता दमानिया आरोप करत असून लोकांची दिशाभूल करत आहे असं पत्रकच महानिर्मितीने प्रसिद्ध केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 04:43 PM IST

ताज्या बातम्या