आज रंगणार एशिया कपमधली भारताची पहिली मॅच

आज रंगणार एशिया कपमधली भारताची पहिली मॅच

  • Share this:

india vs bangladesh26 फेब्रुवारी :  एशिया कपमध्ये आज टीम इंडिया आपली पहिली मॅच खेळणार आहेत ते यजमान बांगलादेशसोबत. गेल्या 12 वन डेमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे विजयाचा हा दुष्काळ टीम इंडिया मोडेल का हाच खरा प्रश्न आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया आता एशिया कपसाठी सज्ज झाली आहे. पण अजूनही बॅटिंगमधील सातत्य, मिडल ऑर्डरची समस्या आणि बॉलिंगचे प्रश्न टीम इंडियासमोर कायम आहेत. त्यातच घरच्या मैदानावर बांगलादेशचा खेळ नेहमीच चांगला झाला.

याआदी  3 महत्वाच्या मॅचमध्ये बांगलादेशने भारताला दणका दिला होता. त्यामुळे हे आव्हान टीम इंडियासाठी तितके सोपे नसेल. पण बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकिब अल हसन या मॅचला मुकणार आहे. शाकिब अल हसनवर 3 मॅचची बंदी आहे. गेल्या वेळी एशिया कपमध्ये या दोन्ही टीम आमने सामने आल्या तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट करिअरमधील 100 वी सेंच्युरी ठोकली होती. पण ती मॅच बांगलादेशने जिंकली होती. त्यामुळे या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम लावते का हे बघणे महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 09:30 AM IST

ताज्या बातम्या