अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार हंगामी अर्थसंकल्प

अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार हंगामी अर्थसंकल्प

  • Share this:

Image img_235182_ajitpawar346337_240x180.jpg25 फेब्रुवारी :  आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार आज विधानसभेत लेखानुदान, म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प मांडणार आहेत.

लोकसभा निवडणुकीमुळे केंद्राचं बजेट मांडलं गेलं नाही. त्यामुळे राज्यसरकारला सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर पावसाळी अधिवेशनात यंदाचं बजेट मांडावं लागणार आहे. म्हणूनच चालू आर्थिक वर्षाखेरपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंतच्या वाढीव खर्चाला आणि 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंतच्या आगाऊ खर्चाला विधीमंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यासाठीच हे लेखानुदान अधिवेशन होतंय.

आज दुपारी दोनच्या सुमारास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेमध्ये लेखानुदान मांडणार आहेत. ते एक प्रकारे राज्याचं अंतरिम बजेटच सादर करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात सामान्यांना किती दिलासा मिळेल याबाबत उत्सुकता आहे.

यंदा संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी केवळ लेखानुदान मांडण्यात येणार आहे. सरकारतर्फे काय सवलती दिल्या जातात याकडे जसे लोकांचे लक्ष लागले आहे तसेच जकातीला पर्याय म्हणून एलबीटी करास व्यापाऱ्यांचा विरोध असून, त्याबाबत सरकार काय भूमिका मांडते याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. साधारणत: चारेक हजार कोटींचं लेखानुदान राज्य सरकार मांडण्याची शक्यता आहे.

First published: February 25, 2014, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading