प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे कोल्हापूरच्या 1 लाख विद्यार्थांना फटका

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2014 07:30 PM IST

प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे कोल्हापूरच्या 1 लाख विद्यार्थांना फटका

12th exam kolhapur24 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या प्राध्यापकांच्या बहिष्काराचा फटका कोल्हापूर विभागामधल्या तब्बल 1 लाख 22 हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे.

12 वीचे 3 पेपर होऊनही अजून उत्तरपत्रिका प्राध्यापकांनी स्विकारलेल्या नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका कॉलेजमध्ये आणि पोस्टामध्ये पडून आहेत. या आंदोलनात कोल्हापूर विभागातले म्हणजेच कोल्हापूरसह सातारा आणि सांगली जिल्हातील 4 हजार शिक्षक सहभागी झालेत.

त्यामुळे परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. तर या आंदोलनामुळं विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही, असं शिक्षकांच्या संघटनेचं म्हणणं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2014 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...