News18 Lokmat

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2014 08:32 PM IST

Image congress_aajcha_sawal_300x255.jpg21 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने यादी निश्चित केल्यानंतर काँग्रेसनेही आपली यादी तयार केलीय. काँग्रेसच्या देशपातळीवरच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली काही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.

काही अपवाद वगळता अनेक जागांच्या उमेदवारांची नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहे. आयबीएन-लोकमतच्या हाती काँग्रेस उमेदवारांची यादी लागलीय. या यादीनुसार दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचे नाव निश्चित आहे. तर दक्षिण-मध्य मुंबईमधून डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि एकनाथ गायकवाड यांची निश्चित आहे.

प्रिया दत्त आणि संजय निरुपम यांनी आपली जागा कायम राखलीय. तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांचं नाव निश्चित समजलं जातंय. राज्यातल्या काँग्रेसच्या वाट्याच्या 26 जागांवरच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची छाननी केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरडे यांच्या अध्यक्षतेखालच्या छाननी समितीनं केली आहे. आठवडाभरात या यादीवर शेवटचा हात फिरवून यादी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या केंद्रीय निवड समितीला पाठवण्यात येईल.

Loading...

काँग्रेसच्या संभाव्य उमदेवारांची ही नावं

 • दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा
 • दक्षिण-मध्य मुंबई - डॉ. भालचंद्र मुणगेकर/एकनाथ गायकवाड
 • उत्तर-मध्य मुंबई - प्रिया दत्त
 • उत्तर मुंबई - संजय निरुपम
 • उत्तर-पश्चिम मुंबई - गुरुदास कामत
 • सिंधुदुर्ग-रत्नागिरी - निलेश राणे
 • अकोला - डॉ. प्रकाश आंबेडकर
 • चंद्रपूर - संजय देवतळे
 • गडचिरोली - मारोतराव कोवासे/ डॉ. नामदेव उसेंडी
 • रामटेक - मुकुल वासनिक
 • नागपूर - राजेंद्र मुळक/ विलास मुत्तेमवार
 • वर्धा - चारुशीला टोकस/ दत्ता मेघे
 • वाशिम-यवतमाळ - जीवनराव पाटील(मुख्यमंत्र्यांची पसंती)
 • शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
 • धुळे - सत्यजित गायकवाड/अमरीश पटेल
 • नंदुरबार - माणिकराव गावित
 • रायगड - हिंगोलीबरोबर अदलाबदलची शक्यता
 • पालघर - बळीराम जाधव/राजेंद्र गावित
 • भिवंडी - मुझफ्फर हुसैन
 • पुणे - विनायक निम्हण/विश्वजित कदम/कलमाडींच्या मर्जीतला उमेदवार
 • सांगली - प्रतीक पाटील
 • सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
 • लातूर - जयवंत आवळे/अमित देशमुखांच्या मर्जीतला उमेदवार
 • नांदेड - अमिता चव्हाण/अशोक चव्हाण
 • जालना - कल्याण काळे
 • औरंगाबाद - उमेदवाराचा शोध सुरू
 •  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...