अशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रिय ?

अशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रिय ?

  • Share this:

Image asok_chavan_on_election_300x255.jpg21 फेब्रुवारी : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातून एकाप्रकारे सुटका मिळवलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीत सक्रिय करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं कळतंय. त्यांना निवडणूक प्रचार समितीचं अध्यक्षपद किंवा नांदेडची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

त्यासाठी काँग्रेस नेत्यांची जोरदार लॉबिंग सुरू केलीय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मोहन प्रकाश यांनी अध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण यांची नावाची शिफारस केलीय. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढं केलंय. अशातच पतंगराव कदम, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील आणि नितीन राऊत यांनीही आपआपल्या परीनं दिल्लीत प्रयत्न चालवले आहेत.

या अध्यक्षपदाच्या निवडीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरूद्ध माणिकराव ठाकरे ही झुंज पाहायला मिळणार आहे. आदर्श घोटाळ्याच्या अंतरिम अहवाल अंशत: स्वीकारल्यानंतर अशोक चव्हाणांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे अशोक चव्हाण पुन्हा राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा सुरू झाली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

First published: February 21, 2014, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading