बारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

  • Share this:

Image img_230902_12thexam345_240x180.jpg21 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षा सुरू होऊन दोन दिवस झाले.पण पेपर तपासणीवरचा कामावर बहिष्कार सुरूच आहे. आता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

आज (शुक्रवारी) बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होता. यासंदर्भात, पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात इंग्रजीच्या चीफ मॉडरेटर्सची बैठक होती. पण, या बैठकीवर मॉडेरेटर्सनी बहिष्कार टाकला. गुरुवारी मराठी विषयाच्या मॉडरेर्टची बैठक होती. त्यालाही मॉडेरेटर्स गैरहजर राहिले होते.

बारावीच्या परीक्षेला तब्बल 13 लाख विद्यार्थी बसले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या मागण्या मान्य करुन एक महिना उलटलाय. पण त्याबाबतचा जीआर अजूनही निघालेला नाही. त्याचा निषेध म्हणून  पेपर तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यानं जुक्टा संघटनेनं मराठी विषयाच्या उत्तर पत्रिका ताब्यात घ्यायला नकार दिलाय.

First published: February 21, 2014, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading