यंदाची आयपीएल स्पर्धा देशाबाहेर घ्या - सुशीलकुमार शिंदे

यंदाची आयपीएल स्पर्धा देशाबाहेर घ्या - सुशीलकुमार शिंदे

  • Share this:

ipl fgd21 फेब्रुवारी :  आयपीएलचा सातवा सीझन भारतात खेळवला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय.एप्रिल-मे मध्ये आयपीएलच्या सातव्या सीझनच्या मॅचेस होणार आहेत. त्याच सुमारास देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मॅचेससाठी पुरेशी सुरक्षा पुरवणं शक्य नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आयपीएलचे कमिशनर रणजीब बिस्वल यांनी बीसीसीआय दक्षिण अफ्रिकेसह इतरही जागांच्या पर्यायांचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. या महिनाअखेरीपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.तर आयपीएलच्या सेमीफायनल्स आणि फायनल तरी भारतात घेता येतील का याबाबत बीसीसीआय चाचपणी करत आहे, असंही ते म्हणालेत. आयपीएलचा दुसरा सीझन 2009 मध्ये याच कारणावरून दक्षिण अफ्रिकेमध्ये खेळवला गेला होता.

First published: February 21, 2014, 12:51 PM IST

ताज्या बातम्या