नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये हापूस दाखल

नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये हापूस दाखल

  • Share this:

mango20 फेब्रुवारी : अचानक झालेल्या हवामानात झालेल्या बदलामुळे मोहोर लवकर आल्याने या वर्षी आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा हापूसची चव लवकरचं आणि भरपूर वेळा चाखायला मिळणार आहे.

फळांचा राजा आंबा फेब्रुवारी महिन्यात वाशीच्या एपीएमसी मार्केट मध्ये दाखल झालाय. कोकणातल्या देवगड, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, रत्नागिरी इथून आंब्याच्या पेट्यांची ही नवी मुंबईत एपीएमसीच्या मार्केचमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली. आज तब्बल 300 पेट्यांची आवक झाली आहे. एका डझनाला 700 रुपये ते 1500 रुपये दराने हा पहिला हापूस विकला जातोय.

आंबा चांगल्या प्रतीचा असून आता त्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे आंब्यांच्या प्रेमींसाठी हे वर्षं एक पर्वणीचं ठरताना दिसतयं.

First published: February 20, 2014, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading