फेसबुकने घेतलं 'व्हॉट्‌स अ‍ॅप'ला विकत... आता चर्चा तर होणारच

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2014 04:26 PM IST

फेसबुकने घेतलं 'व्हॉट्‌स अ‍ॅप'ला विकत... आता चर्चा तर होणारच

WATSAPP20 फेब्रुवारी :  तरूणांमध्ये अल्पवधीतच प्रसिद्धी मिळवणारे व्हॉट्स अ‍ॅप हे मोबाइल मॅसेजिंग स्टार्ट अप्लिकेशन आता फेसबुक विकत घेणार आहे. फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपला 19 अब्ज डॉलर रूपयात  विकत घेणार आहे.

जगभरात सोशल नेटवर्क वाढवण्यासाठी फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्स अ‍ॅपचे जगभरात 450 दशलक्ष युजर्स आहेत.

मोबाइल अ‍ॅपची वाढती बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. मॅसेजिंग सोबतच सोशल नेटवर्किंगवर फोटो आणि यू ट्यूबवर व्हिडिओ शेअरची सुविधा देणारे व्हॉट्स अ‍ॅप जगभरात एक महत्त्वाचे अॅप ठरले आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये व्हॉट्स अ‍ॅप उशिरा उतरले असले तरी स्मार्टफोनवर उपलब्ध असल्याने अगदी काही काळातचं हे अ‍ॅप इतर अ‍ॅपच्या तुलनेत जास्त लोकप्रिय ठरले आहे. याआधी विकत घेतलेल्या 'इन्स्टाग्राम' प्रमाणेच 'व्हॉट्‌स अप' हीदेखील स्वतंत्र सेवा ठेवण्याचा मनोदयने फेसबुकने व्यक्त केला आहे. 'इन्स्टाग्राम' हे सॉफ्टवेअर फेसबुकने 715 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतले होते.

व्हॉट्स अ‍ॅपवर रोज जवळपास एक लाख लोक कनेक्ट होतात. यामुळेच व्हॉट्स अ‍ॅपला खरेदी करून फेसबुक आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुकच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, 19 अब्ज डॉलर रूपयात ही डिल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2014 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...