कैद्यांचा थाट, नाशिक जेलमध्ये मिळते व्हीआयपी सेवा

कैद्यांचा थाट, नाशिक जेलमध्ये मिळते व्हीआयपी सेवा

  • Share this:

nasik jail19 फेब्रुवारी : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना व्हीआयपी सेवा मिळत असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी बाबा मुसा चव्हाण याची कार कारागृहाच्या आवारात स्टाफ क्वार्टर्समध्ये पार्क केल्याची आढळली.

तुरुंग अधिकार्‍यांनी याची चौकशी करत असल्याचं आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. बॉम्बस्फोटातल्या आरोपींना नातलगांना भेटण्यासाठी सवलत देणं, आरोपी पप्पू कलानी याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं, यासारखे धक्कादायक प्रकार नाशिकरोड कारागृहात सुरू आहेत.

व्हीआयपी कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी नाशिक रोड कारागृह प्रसिद्ध आहे. यापूर्वीही कारागृहातल्या या खास कैद्यांसाठीच्या खास व्यवस्था आयबीएन-लोकमतनं उघड केल्यात. आता त्याच खास सेवा पप्पू कलानी आणि बॉम्बस्फोटातल्या आरोपींना दिल्या जात आहेत.

कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट

* बॉम्बस्फोट आरोपी बाबा मुसा चव्हाण याची कार

कारागृहाच्या आवारातील स्टाफ क्वार्टरमध्ये आढळली

*आरोपी पप्पू कलानीला खास सेवा

पक्का कैदी असूनही वेगळी वागणूक

कैद्यांच्या गणवेशापासून सुटका

* बॉम्बस्फोटातल्या आरोपींना खास सेवा

नियम डावलून नातलगांच्या मुलाखती

First published: February 19, 2014, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading