बायको पळून गेली म्हणून 2 मुलींची हत्याकरुन पतीची आत्महत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2014 04:56 PM IST

बायको पळून गेली म्हणून 2 मुलींची हत्याकरुन पतीची आत्महत्या

nalasopar sucide 519 फेब्रुवारी (मुंबई): नालासोपार्‍यात एका पित्याने आपल्या दोन लहान मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. श्रीधर शेट्टी (वय 40) असं या व्यक्तीचं नाव आहे. पत्नी शेजार्‍याबरोबर पळून गेल्यानं निराश झालेल्या श्रीधर शेट्टीनं हे टोकाचं पाऊल उचललं.

श्रीधर शेट्टी आचोळे रोड येथील गणेश शॉपिंग सेंटरमध्ये भाड्याने राहणार्‍या सोनाली उर्फ हेलेन डिकूना हिच्यासोबत नऊ वर्षाची मुलगी श्रद्धा आणि पाच वर्षाची मुलगी साहिद्या सोबत गेल्या 6 महिन्यांपासून राहत होते. त्याच्या घरासमोर राहणार्‍या तेजस दोशी या युवकाशी त्याच्या पत्नींच सुत जुळलं आणि त्यांनी व्हेलेंटाईन च्या आदल्या दिवशी तेजस सोबत घर सोडून निघून गेली. जाताना तिने आपल्या दोघांमुलीना ही घेवून गेली.

मात्र तिची समजूत काढून परत तिला घरी आणण्यात आलं होतं. 17 फेब्रुवारीच्या रात्री श्रीधर आणि सोनाली यांच्यात कडाक्याचं भांडण झालं.आणि ती मुलींना बरोबर न घेताच पऴून गेली. त्यामुळे निराश होऊन श्रीधरनं आपल्या दोन लहान मुलींचा जीव घेतला आणि स्वतः घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीधरने दोन्ही मुलींसाठी भिंतीवर मेसेज लिहून ठेवला होता. याला जबाबदार माझी पत्नी असून मी तिच्या सर्व गरज पुरवल्यात. पण मी कुठे कमी पडलो म्हणून हा निर्णय घेतला. अद्याप पर्यंत तेजस आणि सोनाली परत आलेले नाहीत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2014 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...