सेनेला 'जय महाराष्ट्र', वाकचौरे काँग्रेसच्या तंबूत दाखल

सेनेला 'जय महाराष्ट्र', वाकचौरे काँग्रेसच्या तंबूत दाखल

  • Share this:

vakchore18 फेब्रुवारी : शिर्डीचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहे. वाकचौरेंनी आज (मंगळवारी) काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केलाय. मात्र 24 तारखेला म्हणजे येत्या सोमवारी अधिकृतपणे प्रवेश करणार आहे. 24 फेब्रुवारीला अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचा मेळावा होतोय. या मेळाव्यात ते काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. वाकचौरे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. एवढंच नाही तर वाकचौरेंनी बाळासाहेब विखे पाटील यांची भेटही घेतली होती. त्यामुळे वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरूवात झाली होती. अखेर आज वाकचौरे काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. आणि या चर्चेदरम्यान वाकचौरे औपचारीकरित्या काँग्रेसमध्ये दाखल झाले.

पण 24 फेब्रुवारीला अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचा मेळाव्यात ते अधिकृतपणे प्रवेश करतील असं ठरलंय. कारण संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि वाकचौरेंच्या प्रवेशामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांचा अधिकृत प्रवेश न होता औपचारीक झालाय. वाकचौरे हे अगोदर शासकीय अधिकारी होती. तसंच ते शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीही राहिलेत. बाळासाहेब विखे पाटील गटाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. 2009 मध्ये शिर्डीत काँग्रेसकडून वाकचौरेंना तिकीट जवळपास मान्य झालं होतं पण ऐनवेळी आघाडीने रामदास आठवले यांना तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या वाकचौरेंनी सेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.

आता बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या मर्जी शिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. याची खात्री झाल्यामुळे वाकचौरे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. वाकचौरे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे शिवसेनेला हा दुसरा धक्का आहे. कारण या अगोदर कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का समजलाय जातोय. वाकचौरे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे शिर्डीत पडसाद उमटले आहे. शिर्डीत शिवसैनिकांनी भाऊसाहेब वाकचौरेंच्या पुतळ्याचं दहन केलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2014 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading