सेनेचे खा. वाकचौरे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

  • Share this:

bhausaheb vakchore18 फेब्रुवारी : शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहण्यासाठी बांधलेला शिवबंधनाचा धागा आता शिवसैनिकच काढून टाकत आहे . शिर्डी, औरंगाबाद आणि हिंगोलमधील शिवसेनेत नाराजी आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

आयबीएन लोकमतने सर्वप्रथम यासंबंधी बातमी दिली होती. वाकचौरेंनी बाळासाहेब विखे पाटील यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे औरंगाबादमधले शिवसेनेचे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आणि  काँग्रेसच्या 'जय हो'चा नारा दिलाय. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी निष्क्रीय खासदार असल्याचा आरोप केला आहे.

हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांना बदलण्याची मागणी शिवसेनेच्या वसमतच्या शिवसेना शहरप्रमुख तानाजी कदम यांनी पत्रकाद्वारे उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी तानाजी कदम यांना फोनवरुन धमकावल्याचा आरोप शिवसेनेचेच पदाधिकारी करत आहेत. याच बाबत हिंगोलीत एका विशेष बैठकीत सुहास सामंत यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. शिवाय सुहास सामंत यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचंही पदाधिकार्‍यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2014 07:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading