'आप'मुळे लोकसभेच्या रिंगणात चौरंगी लढत

'आप'मुळे लोकसभेच्या रिंगणात चौरंगी लढत

 • Share this:

gadkari vs aap17 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीने आपल्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात राज्यातून सहा जणांना उमेदवारी मिळाली आहे. या उमेदवारांमुळे लोकसभेच्या सर्वच जागांवर चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

गेल्या निवडणुकीत मनसेनं या सर्व मतदार संघात तिरंगी लढतीत आपली छाप पाडली होती. या निवडणुकीत आम आदमी पार्टीमुळे या लढती आता चौरंगी पाहायला मिळेल. गेल्या निवडणुकीत मिळालेली मत राखणं मनसेपुढे आव्हान असेल. कशा असतील या लढती याबद्दल घेतलेला हा आढावा

1) ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ

 • संजय दिना पाटील - राष्ट्रवादी
 • कमळ - भाजप
 • इंजिन - मनसे
 • मेधा पाटकर - आप

ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यांच्याविरोधात केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेले किरीट सोमय्या अथवा प्रमोद महाजन यांच्या कन्या पुनम महाजन असतील. पहिल्याच निवडणुकीत जवळपास दोन लाख मतांचा आकडा पार केलेल्या मनसेच्या वतीने या ठिकाणी आमदार शिशिर शिंदे ऐवजी एखाद्या नव्या नावाची चर्चा सुरू आहे. ही तिरंगी लढत असताना आम आदमी पार्टीने सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांना उमेदवारी दिलीय. ईशान्य मुंबई मतदार संघात घाटकोपर वेस्ट, मानखूर्द हे विधानसभेचे मतदार संघात झोपडट्टीधारकांची संघ्या मोठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मेधा पाटकर यांनी झोपडपट्टीवाशीयांसाठी सुरू केलेला संघर्ष पाहता ते चांगली लढत देण्याची शक्यता आहे.

2) उत्तर-पश्चिम मुंबई

 • गुरुदास कामत - काँग्रेस
 • गजानन किर्तीकर - शिवसेना
 • शालिनी ठाकरे - मनसे
 • मयांक गांधी - आप

मुंबईतील दुसरा मोठा मतदार संघ असलेल्या मुंबई नॉर्थ-वेस्ट...या मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होता. त्यात मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी पहिल्याच निवडणुकीत सव्वा लाख मतं मिळवत शिवसेनेला खिंडार पाडलं होतं. या मतदारसंघात हे तीन उमेदवार पुन्हा निवडणूक लढवतील. पण यावेळी आपच्या मयांक गांधी यांच्या उमेदवारीमुळे ही लढत चौरंगी होणार आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, दिंदोडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर वर्सोवा अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट या तीन मतदार संघात काँग्रेसचं वर्चस्व आहे. असं असताना यावेळी मनसेनं आपले पाय पसरवलेत. अशा परिस्थितीत आपच्या प्रसिध्दीच्या करिश्मावर मयांक गांधी किती मतं मिळवतात याकडे लक्ष लागेललं आहे.

3) दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ

 • मिलिंद देवरा - काँग्रेस
 • मोहन रावले - शिवसेना
 • बाळा नांदगावकर - मनसे
 • मीरा संन्याल - आप

दक्षिण मुंबई विधानसभा मतदारसंघात 'आप'नं मीरा संन्याल यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांच्यासाठी उच्चभ्रू वर्गातले किती मतदार मतदान केंद्रापर्यंत येतील, यावर ही लढत ठरलेली आहे. नाहीतर या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वरळी, शिवडी, भायखळा हा मराठी मतदारांचा मोठा भरणा आहे. तर मलबार कुलाबा येथे उच्चभ्रु वर्गातील मतं निर्णायक आहे. मुंबादेवी या यामुळे या सहाही विधानसभा मतदार संघात शिवसेना, मनसे आणि काँग्रेसची समान ताकद आहे. अशा परिस्थितीत ही तिरंगी लढत आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा 2 लाख 72 हजार मतं घेत पहिल्या क्रमांकावर होते. मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एक लाख मतं घेत दुसरा क्रमांक पटकवाला. तर शिवसेनेचे पाच वेळा खासदार असलेले मोहन रावले तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. यावेळी या ठिकाणी मनसेच्या वतीने उमेदवार बदलण्याची चिन्ह आहेत. तर शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत उमेदवार असणार आहेत. मीरा सन्याल या पुन्हा निवडणूक लढवत आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 10 हजार मतांवर समाधान मानावं लागेल्या मीरा सन्याल आप च्या करिश्मावर या मतांमध्ये किती वाढ करू शकतील हे मोठं आव्हान आहे.

4) पुणे लोकसभा मतदार संघ

 • हाथ - काँग्रेस
 • अनिल शिरोळे - भाजप
 • दीपक पायगुडे - मनसे
 • सुभाष वारे - आप

या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशी सरळ सरळ लढत होते. पण यावेळी दीपक पायगुडेच्या रुपानं तगडा उमेदवार मनसे रिंगणात उतवरतोय. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार हे नक्की आहे. काँग्रेसकडून खासदार सुरेश कलमाडी यांची पत्नी मीरा कलमाडी निवडणुकीच्या रिंगणात असतील असा दावा कलमाडी गटाकडून करण्यात येतोय. तर वनमंत्री पतंगराव कदम आपला मुलगा विश्वजीत कदम याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या निवडणुकीत दोन लाख 54 हजार मतं मिळवणारे अनिल शिरोळे हेच भाजपाच्या वतीनं उमेदवार असणार आहेत. आम आदमी पार्टीने यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांना उमेदवारी दिलीय. पुणे लोकसभा मतदार संघात स्वच्छ आणि उच्चशिक्षित उमेदवार देण्याचे प्रयोग यापुर्वीही झालेत. भ्रष्टाचाराशी दोन हात करणारे अरुण भाटिया यांनी गेली निवडणूक लढली होती पण केवळ पन्नास हजारांचा टप्पा गाठता आला. अशा परिस्थीत सुभाष वारे यांना मतांसाठी मोठं आव्हान असेल.

5) नाशिक लोकसभा मतदारसंघ

 • भुजबळ - काँग्रेस
 • डॉ. प्रदीप पवार - मनसे
 • धनुष्य - शिवसेना
 • विजय पांढरे - आप

नाशिकमध्ये होणार्‍या चौरंगी लढतीत सगळ्यांचीच प्रतिष्ठापणाला लागणार आहे. भुजबळ विरुद्ध पांढरे विरुद्ध मनसे विरुद्ध शिवसेना अशी चौरंगी लढत नाशिकमध्ये होणार आहे. सिंचन खात्यातल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे माजी अधिकारी विजय पांढरे यांना आम आदमी पक्षातर्फे नाशिकमधून उमेदवारी देण्यात आलीए. राष्ट्रवादीतर्फे भुजबळांची उमेदवारी अंंतिम आहे, कोणते भुजबळ याबाबत संदिग्धता असले तरी पक्षाच्या वतीनं मोठ्या भुजबळांच्या नावाचेच संकेत आहेत. मनसेतर्फे डॉ. प्रदीप पवार यांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या सार्‍यात शिवसेनेतर्फे मात्र गोडसे की करंजकर याचा वाद आहे. गेल्या वेळेस नाशिकमध्ये राष्ट्रवादी - मनसे आणि सेना अशी तिरंगी लढत झाली होती. यंदा यात आपचे रंगही आल्यानं ती चौरंगी झाली.

6) नागपूर लोकसभा मतदार संघ

 • विलास मुत्तेमवार - काँग्रेस
 • नितीन गडकरी - भाजप
 • हत्ती - बसप
 • अंजली दमानिया - आप

आम आदमी पार्टीमुळे अनेक ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळत असली तरी नागपूर मध्ये काँग्रेस आणि भाजपात सरळसरळ लढत होईल. आपच्या उमेदवार असलेल्या अंजली दमानिया यांच्यामुळे ही लढत तिरंगी होतेय खरी, पण भाजपाचा केडरबेस कार्यकर्ता आणि मतदार त्याच पद्धतीने काँग्रेसचा हक्काचा मतदारांना धक्का लावणं अंजली दमानिया सोप्प नाही. भाजपाच्या वतीने नितीन गडकरी हे रिंगणात असणार आहेत. याच ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला आहे. त्याच वेळी काँग्रेसच्या वतीनं विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार हे रिंगणात असणार आहेत. मुत्तेमवारांचे दलित, मुस्लीम आणि परप्रांतीय मतदार मोठा आहे. त्यात मायावतींचा बसपाची नागपुरात मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत अंजली दमानिया कुठली आणि किती मतं मिळणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे. पण दमानियांची उमेदवारी गडकरींची डोकेदुखी वाढवणार हे नक्कीय.

First published: February 17, 2014, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading