News18 Lokmat

100 टक्के टोल बंद होणार नाही -अजित पवार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2014 08:41 PM IST

100 टक्के टोल बंद होणार नाही -अजित पवार

sag 444234 ajit pawar on toll13 फेब्रुवारी : आजच्या घडीला कुणी म्हणालं म्हणून कोणत्याही परिस्थितीत 100 टक्के टोल बंद करता येणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

तसंच आमची सत्ता आल्यावर राज्य टोलमुक्त करू अशी घोषणा गोपीनाथ मुंडेंनी जरी केली असेल पण त्यांच्याच पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी टोल मुक्त राज्य होऊ शकत नाही असं कबूल केलंय असा चिमटाही अजित पवारांनी काढलाय.

तसंच मनसेच्या आंदोलनामागे राज्य सरकारचं अजिबात राजकारण नाही. असं राजकारण करुन प्रत्येक जण आपली भूमिका घेऊन जनतेपुढे जातं असतो. आता निवडणुकांच्या तोंडावर काही लोकं आंदोलनं करतात. आपण जनतेचे कैवारी आहोत असं दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात पण जनतेला सर्व ठाऊक आहे असा टोलाही अजित पवारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

Loading...

अठरा वर्ष मुदतीचे जे टोल आहेत त्या रस्त्यावर जर वाहनांची संख्या वाढली असेल तर त्या टोल वसुलीतला नफा राज्य सरकारकडे वळतं करण्याबाबत विचार सुरू आहे. तसंच ज्या टोलची मुदत पाच वर्ष किंवा तीन वर्षं राहिलेली असेल त्या बीओटी तत्वावरच्या टोलकंपन्यांचे पैसे राज्य सरकारच्या बजेट मधून भरता येतील का हे तपासण्याचं काम सुरू आहे असंही पवारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2014 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...