आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करायला बीसीसीआय तयार

4 मार्चआयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. मतदानाच्या दिवशी आयपीएलच्या मॅच होणार नाही, याची काळजी घेऊ असं बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनीही बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून 16 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. आणि आयपीएल स्पर्धा 10 एप्रिलपासून सुरू होत आहेत. निवडणुकीमुळे आयपीएलसारख्या स्पर्धेला आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवणं कदाचित शक्य होणार नाही, त्यामुळे ही स्पर्धाच पुढे ढकलावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलं होतं. या प्रश्नावर तोडगा काढताना मतदानाच्या दिवशी त्या शहरात मॅच होऊ नये अशी काळजी घेण्याचं आश्वासन मनोहर यांनी दिलं आहे.

  • Share this:

First published: March 4, 2009, 12:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading