राज ठाकरेंना पोलिसांनी सोडलं

राज ठाकरेंना पोलिसांनी सोडलं

  • Share this:

43654 raj free 34612 फेब्रुवारी : टोल विरोधात रास्ता रोको आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चेंबूर इथं ताब्यात घेतलं होतं आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून राज यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. 2 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. राज ठाकरे आता आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजकडे रवाना झाले आहे. आंदोलनात आता ते सहभागी होणार नाही असं सांगण्यात आलंय. कुठेही तोडफोड करु नका, शांतता राखा असं आवाहनही राज यांनी कार्यकर्त्यांना केलं.

आज सकाळी 11 च्या सुमारास राज ठाकरे वाशी इथं आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांचा ताफा चेंबूर इथं पोहचता पोलिसांनी अडवला. कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून राज यांना पुढे जाण्यास मज्जाव घालण्यात आला. पोलिसांनी राज यांना ताब्यात घेतलंय. राज यांना चेंबूर इथं आरसीएफ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं.

राज यांच्यासह बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. राज यांना ताब्यात घेतल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आरसीएफ स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. मात्र राज यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. औरंगाबादमध्ये बीड बायपास हायवेवर एसटीच्या दोन बसेसची तोडफोड करण्यात आलीय. तर इतर ठिकाणी आणखी दोन बसेसची तोडफोड करण्यात आलीय यात एक महिला किरकोळ जखमी झालीय. तर दादर, लोअर परेल आणि डोंबिवली भागातील दुकाने बंद करण्यात आलीय. आता राज यांना सोडण्यात आलंय. शांतता राखण्याचं आवाहन राज यांनी केलंय.

First published: February 12, 2014, 11:36 AM IST

ताज्या बातम्या