11 फेब्रुवारी : एककीकडे मनसेनं टोल विरोधात रस्त्यावर उतरणार आहे पण खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीच टोल बंद करण्याची मागणी केली आहे. राज्यातले सर्व दुपदरी रस्ते आणि पुलावरचे टोल बंद करावे, अशी मागणी जाधव यांनी केलीय. त्यासंबंधी त्यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रही लिहिलं आहे.