कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच -गृहमंत्री

कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच -गृहमंत्री

  • Share this:

r r patil on raj11 फेब्रुवारी : कुणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, कुणीही कायदा हातात घेऊ नये, जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलाय. आर.आर.पाटील यांनी आयबीएन लोकमतकडे मनसेच्या आंदोलनावर भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी कायदा हातात घेऊन नये असं आवाहन केलंय. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये, जनतेला किती वेठीस धरायचं हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावं असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं. तसंच कुणाला अटक करायची की नाही या सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस वेळेवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील असंही आबा म्हणाले.

मनसेच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीसा बजावण्यात आलीय. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जी काही टोल नाक्यांची तोडफोड झालीय ती नियमानुसार वसूल करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आलं आहे. पण अलीकडेच कोल्हापुरात पोलिसांनी कारवाई केली होती तरी पोलिसांवर टीका झाली होती. कारवाई केली नाही तरी टीका होते अशी व्यथाही आबांनी मांडली. तसंच राज ठाकरे यांना चर्चा करायची असेल तर सरकार तयार आहे पण त्यांची तयारी असावी पण रोज उठून कायद्याला आवाहन देत असतील तरही भाषाही योग्य नाही असंही आबा म्हणाले.

First published: February 11, 2014, 9:30 PM IST

ताज्या बातम्या