राज यांच्या 'मफलर' वक्तव्यामुळे मला सावध राहावं लागेल -भुजबळ

राज यांच्या 'मफलर' वक्तव्यामुळे मला सावध राहावं लागेल -भुजबळ

  • Share this:

sadg5 bhjbal on raj 34610 फेब्रुवारी : 'मफलर आवळून कायमच बांधकाम करुन टाकावं' असं राज ठाकरे म्हणाले, मला तर रमेश किणी प्रकरण माहित आहे. रमेश किणींना कसं मारण्यात आलं याबद्दल गूढ अजूनही कायम आहे. त्यामुळे आता मला सावध राहावं लागेल, मला आता भीती वाटत आहे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ यांनी पुन्हा एकदा रमेश किणी प्रकरणाची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठवण करुन देत इशारा दिलाय. रमेश किणी प्रकरणात कुणालाही क्लीन चीट देण्यात आली नाही. रमेश किणींचा खून झाला होता. रमेश किणींचे मारेकरी अजून सापडले नाही असा इशारा भुजबळ यांनी राज यांना दिला.

तसंच राज ठाकरे यांना अटक करु नये. त्यांचा पक्ष ढासाळत चालला आहे. त्यामुळे त्यांनी टोलविरोधात हे आंदोलन उभे केले आहे. राज यांना अटक झाली तर निवडणुकीत अटक नाट्यांचा फायदा व्हावा यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. निवडणुका झाल्यानंतर राज यांच्या अटकेबाबत विचार करावा असंही भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर भुजबळ यांनी राज यांनी टोल नाक्यांबाबत केलेल्या आरोपांचं खंडण केलंय. राज ठाकरे यांनी टोलबाबत अत्यंत चुकीची माहिती लोकांसमोर मांडली असून त्यात काही तथ्य नाही. राज्यात फक्त 1 टक्के रस्त्यांवर टोल आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. सोयीसुविधांच्या बाबतीत दोन वर्षांपुर्वीच राज्य सरकारने सर्व टोल नाक्यांना आदेश दिले असून टोल नाक्यावर सोयीसुविधा उभारल्या जात आहे अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

दरम्यान, टोलविरोधात आक्रमक झालेल्या मनसेविरोधात पोलीस कारवाई करत नसल्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची नक्कल करत अतिशय शेलक्या शब्दात टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातल्या द्वारका परिसरात आज आंदोलन केलं आणि राज यांच्या पुतळ्याचं दहन केलं. विशेष म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी राज यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते त्यावेळीही भुजबळ यांनी रमेश किणी प्रकरणाची राज यांना आठवण करुन दिली होती. आताही भुजबळ यांनी राज यांनी रमेश किणी प्रकरणाची आठवण करुन दिलीय.

First published: February 10, 2014, 11:15 PM IST

ताज्या बातम्या