गरज पडल्यास राज ठाकरेंना अटक करू - गृहमंत्री

गरज पडल्यास राज ठाकरेंना अटक करू - गृहमंत्री

  • Share this:

r r patil on raj10 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 12 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय. आणि सरकारनं मला अटक करून दाखवावीच, असं आव्हानही दिलंय. त्यावर राज ठाकरेंनी कायद्याला आव्हान देवू नये असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलंय.

शांततेनी होण्यार्‍या आंदोलनाला विरोध नाही. मात्र कायदा हातात घेण्याची भाषणं करणार्‍यांना सरकार सोडणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गरज पडल्यास राज ठाकरेंना अटक करण्यास पोलीस कचरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेचं जे काही नुकसान होईल त्याची भरपाई संबंधीत पक्षाकडून केली जाईल असंही आर.आर.पाटील म्हणाले.

तर दुसरीकडे 12 तारखेच्या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरूवात केलीय. मुंबई पोलिसांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांना जमावबंदीची नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद इथं पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटीसा काढल्या आहेत. तसंच मनसेची मान्यताच रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

==========================================================================

संबंधीत बातम्या - हे पण वाचा !

==========================================================================

- 12 फेब्रुवारीला रास्ता रोको, हिंमत असेल तर रोखून दाखवा – राज

राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण 

‘मनसे’च्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका   

मनसेच्या पदाधिकार्‍यांना जमावबंदीची नोटीस

- मुंबई मराठी माणसाचे सासर आहे का? – राज ठाकरे

67 लाखांची ‘टोल’फोड, मनसे कार्यकर्त्यांकडून होणार वसूल?

==========================================================================

First published: February 10, 2014, 8:31 PM IST

ताज्या बातम्या