शिवबंधन तोडून शेकडो शिवसैनिक मनसेत दाखल

शिवबंधन तोडून शेकडो शिवसैनिक मनसेत दाखल

  • Share this:

456 mns 63408 फेब्रुवारी : मुंबईतील विक्रोळीत शिवसेनेला धक्का बसलाय. शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करुन लाखो शिवसैनिकांनी शिवबंधनाचा धागा बांधला होता.

पण या घटनेला महिनाही उलट नाही तेच शिवसैनिकांनी शिवबंधन तोडलं आहे. सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडून मनसेत प्रवेश केला आहे. विक्रोळी पार्क साईटचे सेनेचे माजी माजी नगरसेवक काशीनाथ थराली आणि माजी उपविभागप्रमुख मुकुंद थोरात यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला.

आमदार प्रवीण दरेकर, राम कदम आणि विभाग अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. शिवसेनेची कार्यपध्दत बदलल्यानं हे शिवबंधन तोडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

First published: February 8, 2014, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading