आठवडा उलटूनही मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्तचं!

आठवडा उलटूनही मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्तचं!

  • Share this:

23642376satyapal-singh07 फेब्रुवारी : सत्यपाल सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा राजीमाना देऊन आता सात दिवस झालेत. मात्र, यानंतर हि नव्या पोलीस आयुक्तांची नेमणुक अजून ही झालेली नाही. यामागे आघाडीतलं राजकारण आहे? की निर्णय घेण्यात सरकार पुन्हा अपयशी ठरतंय? मुंबई पोलिसांना वाली कोण?

सत्यपाल सिंग यांनी गेल्या शुक्रवारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा दिला. मुंबई हे संवदेनशील शहर आहे. इथे कधी गडबड होईल हे सांगता येत नाही, यामुळे या पदावर तत्काळ नेमणूक होणं आवश्यक होतं. मात्र,तसं झालेलं नाही. नव्या आयुक्तांची ताबडतोब नियुक्ती होण्यीची आजवरची प्रक्रिया मोडित निघाली आहे, अशी खंत माजी पोलीस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी व्यक्त केलीये.

पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीबाबत पोलीस अस्थापना समिती आहे. या समितीने नव्या पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव राज्यसरकारकडे आधीच पाठवायला हवा होता. तसा प्रस्ताव या समितीने पाठवला नाहीये. तसंच त्याबाबत राज्य सरकार ही उदासीन दिसतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या मतभेदांमुळेही नेमणुकीला उशीर होत असल्याची चर्चा आहे. पण सर्वांचे याचे परिणाम पोलीस दलावर होत असल्याचं जाणकार सांगतायत.

पोलीस आयुक्तांचा कार्यभार सध्या हेमंत नगराळे यांच्याकडे आहे. मात्र, सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झालाय.याचं उत्तर मुख्यमंत्री , गृहमंत्री , गृहविभागाचे मुख्यसचीव, पोलीस महासंचालक यांना द्यावा लागणार आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांची नियुक्ती ही प्रशासकीय बाब आहे, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काहीही भूमिका नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आयुक्त नेमावे अशी मागणीही त्यांनी केली.

First published: February 7, 2014, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading