'बारावीच्या परीक्षा वेळेवरच होणार'

  • Share this:

Image img_215432_rajendradarda_240x180.jpg05 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होती, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाबाबत कायम विनाअनुदानित यातून कायम हा शब्द वगळण्यात आलाय. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांचा याला पाठिंबा मिळेल आणि बारावीच्या परीक्षेत वेळेत होतील असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलंय.

उद्यापासून 12 वीची परीक्षा सुरू होतेय. पण, ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या महासंघाचा संप अजूनही सुरूच आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत कनिष्ठ शिक्षकांच्या दोन मुख्य मागण्या मान्य करण्यात आल्यात. पण संप मागे घेण्याबाबत अजूनही संघटनेनं कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे संमभ्राचं वातावरण निर्माण झालाय. पण राज्य सरकारने परीक्षा वेळेवरच घेण्यात येईल अशी भूमिका घेतलीय. बारावीच्या परीक्षा या ठरल्याप्रमाणे वेळेवरच होतील असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलंय.

मंगळवारी रात्री मुख्याध्यापक संघटनांनी आंदोलनातून माघार घेतलीय. आज संध्याकाळी उच्च माध्यामिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या कृती समितीचे अध्यक्ष टी.एम. नाईक यांनी राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन परीक्षा वेळेवरच होईल अशी ग्वाही दिलीय. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली असून आज मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन मागे घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करतील असा विश्वासही दर्डा यांनी व्यक्त केला. आता उद्या बारावीच्या प्रक्टिकलच्या परीक्षा सुरू होत असून ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना आपला बहिष्कार मागे घेतात की विद्यार्थ्यांना वेठीस धरतात हे पाहण्याचं ठरेल.

First published: February 5, 2014, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading