शिवसेनेचे खा.वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर ?

शिवसेनेचे खा.वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर ?

  • Share this:

bhausaheb vakchore04 फेब्रुवारी : शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी चर्चासुद्धा केलीय. संसदेच्या अधिवेशनानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

वाकचौरेंना शिर्डीतून उमेदवारी देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिल्याचं समजतंय. दरम्यान, वाकचौरेंना थांबवण्यासाठी शिवसेनेनंही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, शिवसैनिकांच्या रोषाच्या भितीनं वाकचौरेंच्या घराभोवती सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत शिवसैनिकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा आणि शिवबंधनाचा धागा बांधण्यात आला. येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली पण शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधनाचा धागा काढून काँग्रेसची वाट धरलीय. त्यामुळे शिवसेना वाकचौरेंना पक्षात थांबवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

First published: February 4, 2014, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading