'मोनो'चा पांढरा हत्ती

'मोनो'चा पांढरा हत्ती

  • Share this:

7987Mumbai_Monorail_run (6)03 फेब्रुवारी :  देशातील पहिलीवहिली मोनोरेल कालपासून मुंबईत धावायला लागली. मोनोरेलच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. मात्र, मोनोरेलचा फस्ट शो फ्लॉप ठरला. काल सुट्टीचा दिवस असल्याने मोनोरेल प्रवासाला मुंबईकरांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला होता. पण आज मोनोरेल स्टेशनवर मुंबईकरांची फारशी गर्दी झालेली नाही.

दरम्यान, काल पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी मोनोरेल तासभर उशिराने निघाली. त्यानंतर प्रवाशांचा वाढत्या गर्दीमुळे सगळे स्टेशन वेळच्या एक तास आधीच बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवास करण्यासाठी आलेल्या लोकांच्या होती फक्त निराशाच आली.

पहिल्या दिवशीच ढिसाळ नियोजनामुळे मोनोरेल आता खूप सारे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

  • निवडणुकांवर डोळा ठेऊन मोनो घाईत सुरू करण्यात आली का?
  • वडाळा मोनो स्टेशनपासून जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवाशांना पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची?
  • मोनोच्या श्रेयासाठी लढणारे पक्ष अर्धवट कामांची जबाबदारी घेतील का?
  • मोनोकडे लोकांनी पाठ का फिरवली, याचा अभ्यास MMRDA करणार का?

First published: February 3, 2014, 1:54 PM IST

ताज्या बातम्या