परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचं आंदोलन

  • Share this:

Image img_54072_college_160609_240x180.jpg03 फेब्रुवारी :  राज्यभरात आजपासून कनिष्ठ महाविद्यालयीन म्हणजेच ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचं बहिष्कार आंदोलन सुरु होत आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेवर ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातल्या बारावीच्या सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना या बहिष्काराचा फटका बसणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असणार्‍या मागण्या अपूर्ण असल्याने हे बहिष्कार आंदोलन पुकारण्यात आले आहे. शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यानं प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. मागण्या मंजूर झाल्याशिवाय बहिष्कार मागे न घेेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.

दरम्यान बारावीच्या आजपासून सुरु होणार्‍या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्या आता 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारी हॉल तिकीटस आज आणि उद्या त्यांच्या कॉलेजमध्ये देण्यात येणार आहेत.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

  • 1996 पासून थ्री टायर पे स्केल मिळावं
  • 1999 पासूनच्या 42 दिवसांच्या रजा सध्याच्या कार्यकाळात लागू व्हाव्यात
  • कायम विनाअनुदानित पद्धत रद्द करण्यात यावी
  • 2008-2009 पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना त्वरित मान्यता देण्यात यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2014 10:45 AM IST

ताज्या बातम्या