शिवाजीराव आढळराव-पाटील यांचं 'प्रगतीपुस्तक'

शिवाजीराव आढळराव-पाटील यांचं 'प्रगतीपुस्तक'

  • Share this:

 रायचंद शिंदे, शिरुर

खासदार शिवसेनेचे पण कसोटी राष्ट्रवादीची अशी गमतीशीर परिस्थिती आहे शिरूर मतदारसंघाची. शिरूरमध्ये आमदार राष्ट्रवादीचे, पण खासदार शिवसेनेचे. गेल्या दहा वर्षांचा पासून या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा हा लेखाजोखा.

मूळचे उद्योजक असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील हे राजकारणात आले ते शरद पवारामुळेच...पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गटबाजीमुळे ते खासदार झाले ते शिवसेनेचे. गेल्या 10 वर्षांपासून शिरुर मतदारसंघाचं दोनवेळा प्रतिनिधित्त्व करणार्‍या आढळरावांनी पायाभूत सुविधांवर अधिक भर दिलाय. ज्या विकासाचं चित्र आढळराव दाखवत आहेत, तो विकास आराखडा आहे कुठे ? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

विकासकामासाठी मिळालेल्या विकासनिधीचा त्यांनी अधिकाधिक वापर केलाय. शिवाय त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे, असं मतदार म्हणत आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीचा मोठा फायदा आढळरावांना मिळेल, असं दिसतंय. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षाकडून आढळरावांपुढं फार मोठं आव्हानही दिसून येत नाही.

खासदार निधीचे प्रगतीपुस्तक

* खासदाराचे नाव - शिवाजीराव अढळराव

* मतदारसंघाचे नाव - शिरूर लोकसभा मतदारसंघ

* उपलब्ध निधी - 19 कोटी रुपये

* मंजूर निधी - 20 कोटी रुपये

* खर्च केलेला निधी - 13 कोटी रुपये

* खासदार निधीचा एकूण वापर - 80%

सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या

* स्वतंत्रपणे: 17

* संयुक्तपणे: 50

* एकूण: 67

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2014 10:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading