इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात

इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात

  • Share this:

3463 Esther Anuhya01 फेब्रुवारी : इस्थर अनुह्या हत्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी तिच्या एका सहकार्‍याला ताब्यात घेतलंय. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. हेमंत मेडा असं त्याचं नाव आहे. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर त्यानं अनुह्याला जेवणाच पॅकेट पुरवलं होतं. अनुयाची हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. त्यानं त्यादिवशी तो चेन्नईत असल्याचा दावा केला होता.

तर दुसरीकडे ही घटना घडली त्यादिवशीचं कुर्ला स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय. त्यात इस्थर अनुह्या सोबत कुर्ला टर्मिनसवर एक अनोळखी व्यक्ती दिसत आहे. इस्थर 5 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर पहाटे पाच वाजता उतरली होती. त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज कुर्ला पोलिसांनी मिळवले. या फूटेजमध्ये इस्थर सोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसत आहे.

या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली आहे. या फूटेजच्या आधारे पोलिसांचे एक पथक हैदाराबादला रवाना झाले. ही अनोळखी व्यक्तीच या हत्याप्रकरणात मुख्य संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हैदराबादमध्ये ताब्यात घेतलेला संशयित सीसीटीव्ही फुटेजमधल्या संशयिताशी मिळताजुळता आहे असा दावा पोलिसांनी केलाय. 5 जानेवारी रोजी सॉफ्टवेअर इंजिनियर इस्थर अनुह्या कुर्ला टर्मिनलवर उतरली होती. त्यानंतर ती गायब झाली होती. दोन आठवड्यानंतर कांजुरमार्गजवळील हायवेलगत झुडपीमध्ये इस्थरचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे पोलिसांसमोर या हत्याप्रकरणाचं आव्हान उभं ठाकलं होतं. गेल्या महिन्याभराच्या तपासातून पोलिसांनी आता एका संशयिताला ताब्यात घेतलं असून लवकरच गूढ उकललं जाईल असा दावा पोलिसांनी केलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2014 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...