सिंहांचा राजीनामा स्वीकारला, लवकरच भाजपमध्ये

सिंहांचा राजीनामा स्वीकारला, लवकरच भाजपमध्ये

 • Share this:

23642376satyapal-singh30 जानेवारी : मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिलेला राजीनामा सरकारनं स्वीकारला आहे. जॉईंट सीपी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. निवृत्तीला दीड वर्ष राहिले असतानाच सिंह यांनी राजीनामा देवून राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतलाय.

ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि नितीन गडकरी यांच्याशी सिंह यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले सिंह यांना मिरत किंवा बागपतमधून लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. 2 फेब्रुवारीला मेरठमध्येच नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे..या सभेतच सत्यपाल सिंह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

कोण आहेत सत्यपाल सिंह?

 • 1980च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी
 • जन्म : 29 नोव्हेंबर 1955 उत्तर प्रदेशातील मीरतच्या बसौलीत
 • रसायनशास्त्रात एम.फिल
 • आयपीएस होण्याआधी शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती
 • ऑस्ट्रेलियातून MBA
 • पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एम.ए. आणि पीएच.डी.

सत्यपाल सिंह यांनी भूषवलेली पदे :

 • पहिलं पोस्टिंग : नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक
 • बुलडाणामध्ये पोलीस अधीक्षकपदी बदली
 • अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
 • मुंबईचे पोलीस सहआयुक्त (गुन्हे)
 • नागपूरचे पोलीस आयुक्त
 • कोकणपट्ट्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक
 • सीबीआयमध्ये विशेष नेमणूक
 • आंध्र आणि मध्य प्रदेशातल्या नक्षली भागांमध्ये विशेष कार्यासाठी विशेष पदक
 • 2004 : उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक
 • 1996 : विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक

 

First published: January 31, 2014, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading