31 जानेवारी : मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देऊन सत्यपाल सिंह राजकारणात प्रवेश करणार आहेत.
1980च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले सत्यपाल सिंह मुंबई पोलीस आयुक्त असताना राजीनामा देणारे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. ते पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये निवृत्त होणार होते. पण त्यांनी एक वर्ष आधीच आपल्या पदाचा राजीनामा देवून ते राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करू पाहत आहेत. सत्यपाल सिंग भाजप किंवा आपकडून उत्तर प्रदेश किंवा मुंबईतून आगामी लोकसभेची निवडणूक लढवू शकतात.
दरम्यान, सत्यपाल सिंह आपल्या पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे, असं दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्यपाल सिंग आता कोणाची ऑफर स्विकारतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही वेळापूर्वीच ते पत्रकारांशी बोलताना आता आपल्याला समाजसेवेसाठी वेळ द्यायचा आहे असं सिंह म्हणाले.
कोण आहेत सत्यपाल सिंह?
सत्यपाल सिंह यांनी भूषवलेली पदे :