S M L

नगरमध्ये तेल माफियांची धुमाकूळ, खुलेआम तेल चोरी !

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2014 10:52 PM IST

नगरमध्ये तेल माफियांची धुमाकूळ, खुलेआम तेल चोरी !

nagar oil thifसाहेबराव कोकणे, अहमदनगर

29 जानेवारी : अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत प्रकरणानंतर राज्यातल्या तेलमाफियांना संपवण्याच्या वल्गना सरकारने केल्या. पण आजही खुलेआम इंधन भेसळ करणार्‍या तेल माफियांची बजबजपुरी सुरू आहे. भेसळीचे हे अड्डे चालवले जात आहेत राजकीय पुढार्‍यांकडून आणि त्यात भागीदार आहेत तेल कंपन्यांचे अधिकारी आणि ज्यांनी त्याला अटकाव घालायचा ते पोलीस कर्मचारी. तेल कंपन्यांबाहेरच दिवसा ढवळा होणार्‍या इंधन चोरी विषयी आयबीएन- लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट...

अहमदनगरमधला हा अकोळनेरजवळचा भारत पेट्रोलियमचा डेपो. या डेपोतून एक टँकर बाहेर पडतो. थोडा पुढे जाऊन शेजारच्या टपरीवर थांबतो. त्यातून 40 लिटर पेट्रोल बाहेर काढलं जातं.या डेपोतून दिवसभरात 250 ते 300 टँकर बाहेर पडतात. प्रत्येक टँकरमधून 40 लिटर इंधन चोरलं जातं. कहर म्हणजे हा उद्योग करणारे आहेत अकोळनेरचे सरपंच सुनिल फालक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संजय फालक.हे सारं राजरोसपुढे शक्य होतंय ते बनावट 'मास्टर की'मुळे. अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या जळीतकांडानंतर तेल डेपोंमधल्या 'मास्टर की'पर्यंत इंधन चोरीचे धागेदोरे पोहोचले. ही मास्टर की, फक्त कंपनीचे अधिकारी आणि पेट्रोलपंप चालक यांच्याकडेच असते. मग ती टँकर चालकाकडे कुठून येते. यावर बराच उहापोह झाला, पण त्याचा बंदोबस्त काही झाला नाही. अहमदनगरच्या या भारत पेट्रोलियमच्या या टँकर मधून सुरू असलेली ही चोरी 'मास्टर की' मुळेच होतेय. त्यावेळी इंधनाच्या टँकर्सना जीपीएस लावल्याचाही गाजावजा करण्यात आला. पण एका त्याचाही पुरता बोजवारा उडालाय. आणि इंधन चोरी सुरूच आहे.

विशेष म्हणजे, यात अहमदनगर जिल्ह्यातील 4 पोलीस अधिकारी, 3 पोलीस उपनिरिक्षक, आणि 1 पोलीस इन्स्पेक्टर सहभागी असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या या ठिकाणहून बदल्याही झालेल्या नाहीत.

या पेट्रोलमाफियांनी या ठिकाणी निगराणी ठेवण्यासाठी पुण्याहून खास गुंडही आणलेत. त्यांच्या परवानगीशिवाय इथे कुणी फिरकू शकत नाही. बाकी पोलीस अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांचे आशीर्वाद आहेतच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2014 08:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close