25 जानेवारी : कोल्हापूर शहरातल्या टोलबाबात रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC) निर्णय घ्यावा असं स्पष्टीकरण सहकारमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलंय.
टोलचा निर्णय युतीच्या काळात झाला, त्याचं धोरण नितीन गडकरींनी तयार केलंय अशी आठवणही पाटील यांनी करुन दिली. त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे हे द्यावेच लागतील असंही पाटील सांगितलं. तर दुसरीकडे कोल्हापूरची लोकसभेची जागा काँग्रेसला हवीय असा पुनरुच्चारही त्यांनी केलाय.
कोल्हापूरचे सध्याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यानी काँग्रेसला समर्थन दिल्याने ही जागा काँग्रेसला हवीय असं पाटील म्हणालेत. त्याचबरोबर आयबीएन नेटवर्क आणि सीएसडीएसनं केलेल्या सर्व्हेचा आदर असल्याचे सांगत त्यांनी यंदाच्या निवडणुकीत यूपीएलाच बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.