लोकल प्लॅटफॉर्मची उंची वाढणार, बजेटमध्ये विशेष तरतूद

लोकल प्लॅटफॉर्मची उंची वाढणार, बजेटमध्ये विशेष तरतूद

  • Share this:

23566 mumbai local24 जानेवारी : मुंबईत लोकल ट्रेनमुळे मोनिका मोरे आणि नंतर तनवीर यांच्या अपघातांनंतर केंद्र सरकारला अखेर जाग आली आहे. मुंबईतल्या 74 रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईमधील एका कार्यक्रमात याबद्दल घोषणा केली.

लोकलच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी येणार्‍या रेल्वे बजेटमध्ये विशेष तरतूद करणार असल्याचं खर्गे यांनी जाहीर केलं. हे काम येणार्‍या तीन वर्षात पूर्ण केलं जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. विशेष बाब म्हणून मोनिका मोरेला रेल्वेतर्फे 5 लाखांची मदतही यावेळी जाहीर करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मोनिका मोरे या तरुणीचे प्लॅटफॉर्मवर खड्‌ड्यात पाय उडकून पडल्यामुळे लोकल खाली दोन्ही हात गमवावे लागले.

ही घटना घडून काही तास उलटत नाही तेच तनवीर या तरुणाला लोकलखाली आपले पाय गमवावे लागले. या घटनेनंतर सर्वपक्षियांनी आंदोलन पुकारले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले होते. यासाठी वेळोवेळी त्यांनी आंदोलनंही केलं. या प्रकरणी रेल्वे अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सोमय्यांनी यांनी केली होती. आज रेल्वेमंत्री खर्गे यांनी केलेल्या घोषणाचं सोमय्या यांनी स्वागत केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2014 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading