S M L

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी रिंगणात, महायुतीचं 'वेट अँड वॉच' !

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2014 07:44 PM IST

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी रिंगणात, महायुतीचं 'वेट अँड वॉच' !

athavale joshi pawar24 जानेवारी : राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांसाठी पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीला निवडणूक होतेय. त्यासाठी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार माजिद मेमन यांनी आज (शुक्रवारी) अर्ज भरले. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र अजूनही राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा केलेली नाही.

 

हुसेन दलवाई यांना पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तर मुरली देवरांच्या जागी राज्यसभेवर जाण्यास अनेक जण इच्छूक आहेत. 28 जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शेवटपर्यंत काँग्रेसचा घोळ सुरुच राहील असं दिसतंय. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राजकुमार धूत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जातेय. ते देखील आज अर्ज भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केलीय.

राज्यसभेच्या निवडणुकीत सध्या काय चित्र आहे ?

शिवसेना

Loading...

- शिवसेनेकडून राजकुमार धूत यांनी भरला अर्ज

- दुसरा उमेदवार द्यायचा की नाही, यावर शिवसेनेत चर्चा सुरू

- पण, राज्यसभेला उभं रहायचं की नाही हे पक्ष ठरवेल

- मनोहर जोशी यांचं IBN लोकमतकडे वक्तव्य

- भाजपकडून महाराष्ट्रातून रामदास आठवले की प्रकाश जावडेकर अजूनही खल सुरुच

- जावडेककर किंवा आठवलेंना बिहारमधून मिळू शकते राज्यसभेची उमेदवारी

- उद्या होणार भाजपचा निर्णय

काँग्रेस

- काँग्रेसकडून हुसेन दलवाईंना पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हं

- मुरली देवरांच्या जागी नवा उमेदवार येणार?

राष्ट्रवादी काँग्रेस

- राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा सुरक्षित

- राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि माजीद मेमन राज्यसभेवर जाणार

- निवडणूक बिनविरोध व्हावी, पवारांची इच्छा

- सातव्या जागेसाठी खरी चुरस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2014 07:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close