कसाबवर चार्जशीट दाखल होणार

कसाबवर चार्जशीट दाखल होणार

25 फेब्रुवारी , मुंबईसुधाकर कांबळे मुंबई हल्ल्याप्रकरणी हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबवर मुंबई पोलीस चार्जशीट दाखल करणार आहेत. क्राईम विभागाचे पोलीस सह आयुक्त राकेश मारिया यांनी ही माहिती दिली. कसाबसह 20 जणांवर चार्जशीट दाखल होणार आहे. हे चार्जशीट एक हजार पानांचं आहे. कसाबला 27 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू झाला. गेले तीन महिने हा तपास सुरू आहे. कसा झाला हा तपास, या तपासातून काय काय समोर आलं त्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे. स्कोडा घेऊन पळालेला कसाब आणि त्याच्या साथीदाराची, गिरगाव चौपाटी इथं पोलिसांशी झटापट झाली. कसाबवर झडप घालणार्‍या तुकाराम ओंबळेंचा यात बळी गेला, पण इतर अधिकार्‍यांनी कसाबला पकडलंच. आणि इथूनच सुरू झाला 26 नोव्हेंबर हल्ल्याचा तपास. दहशतवादी हल्ल्यात पहिल्यांदाचं कसाबसारखा दहशतवादी सापडला होता. मग पोलिसांची व्यूहरचना सुरू झाली. दहा दहशतवाद्यांपैकी ताज हॉटेलमध्ये चौघं, ओबेराय हॉटेलमध्य दोघं, नरिमन हॉऊस इथं दोघं तर सीएसटी स्टेशन इथं कसाब आणि त्याचा साथीदार होता. ही सर्व माहिती कसाबनं दिली. कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात 12 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यात सीएसटी स्टेशनमधील हल्ला, कामा हॉस्पिटल इथला हल्ला, रंगभवन इथला हल्ला, मेट्रो इथला हल्ला, स्कोडा गाडीचा दरोडा, गिरगांव इथला हल्ला, हॉटेल ओबेरायमधील हल्ला, नरिमन हाऊसमधील हल्ला ताज हॉटेलमधील हल्ला, माझगाव येथील टॅक्सीतला बॉम्बस्फोट, विलेपार्ले येथील टॅक्सीतील बॉम्बस्फोट आणि कुबेर बोटीचा तांडेल अमरसिंग सोलंकीची हत्या हेते बारा गुन्हे आहेत. या सर्व घटनांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युपी पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या फईम अन्सारी आणि सबा उद्दीन यांचाही या गुन्ह्यांत समावेश आहे. सर्व घटना मिळून सुमारे 166 जणांचा मृत्यू झाल्याने खुनाचा आरोप आहे. 304 च्या वर व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने खूनाच्या प्रयत्नाचाही आरोप आहे. अपहरणाचा आरोप ठेवण्यात आलायं. हा एक मोठ्या कटाचा भाग असल्याने आयपीसी 120 लावण्यात आलाय. त्या व्यतिरिकत अनलॉफुल ऍक्टीव्हीटी ऍक्ट, पासपोर्ट ऍक्टही लावण्यात आलेत. या व्यतिरिक्त कसाब आणि त्याच्या साथीदारांवर खोल समुद्रात गुन्हा केल्याबाबत तसंच व्ही. टी. स्टेशन इथं रेल्वेचं नुकसान केल्याबाबत रेल्वे ऍक्टनुसार ही आरोप ठेवण्यात आलेत.या आरोपपत्रात सबाउद्दीन आणि फईम अन्सारी हे देखील आरोपी आहेत . त्यांच्यावर कसाब आणि त्याच्या साथिदारांवरच्या आरोपांबरोबरच, त्यांना मदत केल्याचाही आरोप आहे, शिवाय या आरोपपत्रात काही व्यक्तींना फरारी दाखवण्यात आलंय आणि हे फरार आरोपी पाकिस्तानात असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2009 05:56 PM IST

ताज्या बातम्या