21 जानेवारी : राज्यातील तब्बल 3 लाख अंगणवाडी सेविकांचं कामबंद आंदोलन सुरुच आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आतापर्यंत राज्य सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.
राज्यभरात अंगणवाडी सेविकांची निदर्शनं सुरू आहेत. अंगणवाडी सेविकांना मानधन नको, तर वेतन द्यावं, तसंच निवृत्तीनंतर एकरकमी लाभ द्यावा अशा त्यांच्या मागण्या आहेत.
पण त्याकडे दुर्लक्षच केलं जातंय. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये संतप्त भावना आहेत.