विठूरायाच्या दान पेटीत चार पटीनं वाढ!

  • Share this:

vithal 4320 जानेवारी : पंढरपुरात बडव्यांच्या गराड्यातून विठ्ठल रूक्मिणी मुक्त झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 20 हजारांहूनही जास्त विठ्ठल भक्तांनी कुठल्याही अडथळ्याविना विठूरायाचे डोळेभरून दर्शन घेतले. सर्वेाच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंदीर व्यवस्थापनाच्या नियोजनाचा हा पहीला दिवस होता. विशेष म्हणजे या पहिल्याच दिवसभरात भाविकांनी सव्वा लाख रुपयांची रक्कम दान पेटीत जमा केली आहे. मंदिराला नेहमी मिळणार्‍या रकमेपेक्षा ही रक्कम चौपट असल्याचा दावा मंदिर समितीने केला आहे.

पहाटे मंदिर उघडल्यापासून रात्री बंद करेपर्यंतच्या काळात कोणत्या बडवे आणि उत्पातांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीशेजारी उभे राहून देवाच्या पायाजवळ भाविकांकडून ठेवली जाणारी दक्षिणा गोळा करायची, याचे लिलाव करण्याची येथे वर्षानुवर्षे पद्धत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा लिलाव बंद करण्यात आला.

कालपासून बडवे-उत्पात यांच्याऐवजी मंदिर समितीचे कर्मचारी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीशेजारी नियुक्त करण्यात आले आणि दोन्ही ठिकाणी देवाच्या पायाजवळ दक्षिणा पेट्या ठेवण्यात आल्या. भाविकांनी देवाच्या पायाजवळ दक्षिणा ठेवली तर समितीचे कर्मचारी ती रक्कम दक्षिणा पेटीत टाकत आहेत. नवीन व्यवस्थेच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीकडे अनुक्रम 76 हजार 425 आणि 26 हजार 91 रुपये असे तब्बल 1 लाख 2 हजार 516 रुपये जमा झाले.

पूर्वीच्या लिलाव पद्धतीच्या व्यवस्थेतून मंदिर समितीस मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ही रक्कम चौपट जास्त असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2014 09:15 AM IST

ताज्या बातम्या