'ती' मुंबईला निघाली पण...

'ती' मुंबईला निघाली पण...

 • Share this:

343763 anuhya 417 जानेवारी : 23 वर्षाच्या अनुह्या इस्थरचा मुंबईत खून झाला. तो कुणी केला आणि का केला, कधी केला या कशाचीही उत्तरं आतापर्यंत मिळाली नाही. पण महानगरी मुंबईमध्ये झालेल्या या हत्येची कुणीतरी दखल घेईल का असा आर्त प्रश्न तिचे पालक विचारत आहे.

गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनुह्याचा मृतदेह गुरुवारी कांजूरमार्ग इथं झुडपामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला. अनुह्याची निर्घुण हत्या झाल्याचं समोर आलंय. या तरुणीची ओळख पटू नये म्हणून तिच्यावर केमिकल टाकून जाळण्यात आलं. तिच्या हातातील अंगठीवरुन तिची ओळख पटली पण तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

अनुह्या ही मुळची आंध्रप्रदेशची. मुंबई गोरेगाव इथं टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनअर म्हणून काम करत होती. अंधेरीतील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती. नाताळाच्या सुट्टीनिमित्त अनुह्या आपल्या गावी आंध्रप्रदेशला गेली होती. 4 जानेवारी रोजी अनुह्या विशाखपट्टणम एक्स्प्रेसने मुंबईला निघाली. पण दुसर्‍यादिवशी ती हॉस्टेल अथवा कंपनीवर पोचलीच नाही. तिच्या चुलत भावाला जेव्हा अनुह्या हरवल्याची घटना कळली, तेव्हा तो तातडीनं दुबईहून निघाला आणि मुंबईत आला. पोलीस तपासात कोणतीही प्रगती करू शकले नव्हते. फक्त मोबाईल टॉवर भांडूपपर्यंत आढळल्याची माहिती देत होते.

अखेर तिच्या मृतदेह 16 जानेवारी रोजी कांजूरमार्ग येथील एक्स्प्रेस हायवेजवळ झुडपांमध्ये जळालेल्या, कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. तिच्या हातातील अंगठीवरुन तिच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. तिच्यावर बलात्कार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तिचं पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर आंधप्रदेशमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, पाच जानेवारीला याच नावानं एका 26 वर्षांच्या मुलीनं दादर ते अमृतसर या ट्रेननं लोकमान्य टर्मिनल ते धुळे असा प्रवास केल्याचं रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. पण, त्याबाबत आणखी कोणतीही ठोस माहिती पोलीस देऊ शकले नाहीत.

अनुह्या इस्थरचा गूढ मृत्यू

 • - 23 वर्षांची अनुह्या इस्थर मूळची आंध्रप्रदेशतल्या-मच्छिलीपट्टणमची
 • - आयटीमध्ये नोकरी करायची
 • - अंधेरी इथं होस्टेलमध्ये राहत होती
 • - 4 जानेवारीला विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेनं विजयवाडा इथून ती सकाळी साडेसात वाजता निघाली
 • - त्याच दिवशी सकाळी साडे आठ वाजता ती वडिलांसोबत बोलली
 • - 5 जानेवारीला ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचली पण होस्टेलला पोचली नाही
 • - ती मुंबईत पोहोचली तेव्हा तिच्याकडे दोन मोबाईल फोन होते
 • - 5 जानेवारीला दुपारी 3 वा. तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन भांडुप इथं आढळून आलं
 • - 16 जानेवारीला तिचा मृतदेह कांजूरमार्गमध्ये सापडला

सूत्रांची माहिती

 • - लोकमान्य टिळक टर्मिनसमधील काही CCTV कॅमेरे बिघडलेले आहेत
 • - अनुह्या ट्रेनमधून उतरतानाचं कोणतंही फुटेज मुंबई पोलिसांना सापडलेलं नाही
 • - टॅक्सी आणि रिक्षा चालकांची सध्या चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2014 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading