विनोद घोसाळकरांविरोधात गुन्हा दाखल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2014 07:50 PM IST

विनोद घोसाळकरांविरोधात गुन्हा दाखल

45 vinod ghosalkar 4317 जानेवारी : शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणानं वेगळं वळण घेतलं. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना लवकरच चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावणार असल्याची माहिती आहे.

घोसाळकर यांच्याविरोधात कलम 500, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही सर्व कलमं जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्यात अडचण येणार नाही. शीतल म्हात्रेंचा आज (शुक्रवारी) पोलिसांनी जबाब नोंदवला. आपल्या जीवाला धोका आहे.

आपल्याला काही झालं तर त्यासाठी शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळर जबाबदार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. दुसरीकडे राज्य महिला आयोगानंही आमदार विनोद घोसाळकरांना नोटीस पाठवली आहे. 30 तारखेपर्यंत घोसाळकरांना या नोटिसीला उत्तर द्यायचं आहे. दरम्यान, काल रात्री रश्मी ठाकरेंनी शीतल म्हात्रेंची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. पण, महापौर अजूनही म्हात्रेंच्या भेटीला गेलेले नसल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे. नगरसेविका महापौरांना घेराव घातला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2014 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...